Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामचुकार नवर्‍यांचे बहाणे

कामचुकार नवर्‍यांचे बहाणे
काही नवरे घरातील कामं पाहून पळ काढतात आणि काही नवरे असे असतात ज्यांना घरगुती काम सां‍गितले की तोंड वेडेवाकडे करतात. सर्व असे नसले तरी अश्या पुरुषांची संख्या जास्त आहे ज्यांना घरगुती कामं करायला आवडत नाही. सामान्यत सर्व नवर्‍यांचे बहाणेही एकसारखे असतात. पाहू कामं न करण्यासाठी नवरे काय-काय तर्क देतात: 


 
* अरे! कुठे कचरा? मला तर कुठेच धूळ दिसत नाहीये.
मी येतो, मला सरांचा फोन आला आहे.
तू मला हे काम करायला कधी सांगितले?
मी हे करणारच होतो पण...
तू सुरू तर कर मी आलोच.

तू कामवाली मावशीला हे सगळं करायला का नाही सांगत?
प्रत्येक आठवड्यात फ्रीज स्वच्छ करण्याची काय गरज?
उद्या केलं तर नाही चालणार का.
आज मला बरं वाटत नाही.
काल रात्री मला झोप लागलीच नाही, त्यामुळे फार थकवा आलाय.

webdunia
 

* ऑफिसमध्ये फार टेन्शन आहे यार.
माझ्यापेक्षा तू हे कामं पद्धतशीर करू शकते.
मला आपलं घर असच आवडत. कमीत कमी याने माहीत पडतं की इथे कोणी राहतंय.
हे काम तू मला नको सांगत जाऊ.
मी स्वस्थ बसलेला तुला बघवतं नाही का!

webdunia
 

Share this Story:

Follow Webdunia marathi