Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किचन स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स..

किचन स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स..
दररोज आपल्या नोकरी किंवा व्यवसायामुळे आपल्याला आपल्या कामामधून वेळ मिळत नसतो. अशा वेळी आपल्याला दररोज किचन साफ करणे जमत नसते. त्यामुळे ज्या गृहिणी कामामध्ये व्यस्त असतात अशा गृहिणींसाठी काही खास टिप्स..?

डायनिंग टेबल : डायनिंग टेबल हा दररोजच्या जेवणामुळे घाण झालेला असतो. त्यामुळे डायनिंग टेबलला स्वच्छ करण्यासाठी नीलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. टेबलमधून दुर्गंधी येत असल्यास एखाद्या कापडावर नीलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने पुसून घ्या.

फ्रीज : फ्रीजचे दार उकळलेल्या बटाट्याच्या सालींनी स्वच्छ केले जाऊ शकते.

स्टोव्ह : स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी संत्र्याचे साल वापरा. त्याने स्टोव्हला रॉकेलचा जास्त वास येत नाही.

नळ : किचनमधील नळ चकचकीत करण्यासाठी त्यावर थोडेसे टूथपेस्ट लावा आणि गरम पाण्याने धुवून टाका.

कचर्‍याचा डबा : किचनमध्ये जिथे कचर्‍याचा डबा ठेवत असाल ती जागा नियमितपणे फिनेल टाकून स्वच्छ करावी. कारण सर्वात जास्त घाण त्या जागेवर जमते. त्यामुळे बॅक्टेरिया पसरतात. किचनमध्ये नेहमी झाकण असलेले कचर्‍याचे डबे वापरा.

खिडकी आणि दार : किचनची काचेची खिडकी आणि दार घाण झाले असल्यास गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करावी. याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात.

मिक्सर : मिक्सर वापरताना ते वापरून झाल्यास त्यावरील घाण साफ करून त्याला कव्हर घालून ठेवा. त्यामुळे त्यावर धूळ जमा होत नाही.

किचनमध्ये जास्त वस्तू जमा करून ठेवू नये. किचन नेहमी मोकळे असावे. त्यामुळे ते घाण वाटत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मटणाचा तांबडा रस्सा