Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किती टीव्ही बघतात तुमची मुलं?

किती टीव्ही बघतात तुमची मुलं?
सध्याच्या काळात टीव्हीवर अधिकतर कार्यक्रम गुन्हेगारीवर आधारित असतात. हे कार्यक्रम सर्वच मुलं अगदी आवडीनं पाहतात. पण त्यामुळे मुलांच्या मनात एक प्रकारची भीती, नैराश्य, किंवा नकारात्मक भावना निर्माण 
होतात. पाहा या सगळ्यांचे किती वाईट परिणाम असू शकता....
 
काही मुलांचा स्वभाव अचानक बदलून ते खूप आक्रमक वागू लागतात.
 
मुलांना रात्री वाईट स्वप्नं पडतात, ज्यामुळे त्यांच्या मनावर व शरीरावर ताबा राहत नाही आणि ते बेड ओला करतात.
 
सारखे गुन्हेगारीवर आधारित कार्यक्रम पाहून मुलांच्या भावना बोथट होऊन त्यांचे मन दगड बनू शकते.
 
अश्लील गाणी व नायिकांचे अश्लील हावभाव, अशा दृश्यांचा मुलांना वाईट परिणाम होतो. सेक्सबाबत अर्धवट माहिती आणि चुकीचे ज्ञान मिळाल्यामुळे वाईट परिस्थिती येऊ शकते.
webdunia
दिवसातून पाच-सहा तास टीव्ही बघणार्‍या मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. टीव्हीतून येण्यार्‍या रेडिएशनमुळे डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढते.
 
जास्त टीव्ही पाहण्याने मुलांची विचार करण्याची शक्ती हिरावली जाते.
 
टीव्ही पाहण्यासाठी एकाच जागी बसून राहण्यामुळे त्यांच्या शरीराची कमीत कमी हालचाल होते. आणि टीव्हीसमोर बसून सतत खाण्याची सवय असल्याने वजन वाढतं.
 
सतत येत असणार्‍या जाहिरातीच्या आहारी जाऊन मुलं पिझ्झा, नूडल्स, चॉकलेट्स व इतर फ्राइड आयटम्सची मागणी करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी निश्चितच वाईट परिणाम देणारे असतात.
 
म्हणून आपले मुलं किती वेळ टीव्ही पाहतात आहे आणि ती कोणते कार्यक्रम पाहतात, याकडे लक्ष देणे पालकांचे कर्तव्य आहे. पालकांनी नियमावली बनवून मुलांची टीव्ही पाहण्याची वेळ ठरवावी. आणि कोणते चॅनल  
बघायला हवे हे ही निश्चित करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi