Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्लॅटमध्ये राहताय मग काही नियम पाळावे....

फ्लॅटमध्ये राहताय मग काही नियम पाळावे....

वेबदुनिया

शहरांमध्ये हल्ली खालचे घरे जाऊन त्यांची जागा उंचच उंच इमातरींनी घेतली आहे. त्यामुळे बहुतेक कुटुंब फ्लॅटमध्येच राहताना दिसतात. या फ्‍लॅट संस्कृतीचे काही निय पाळले तर आपल्याला आनंदाने अशा इमातरींमधून राहता येते. येथे राहताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

 शेजारच्यांकडे वेळी अवेळी जाऊ नये.
शेजारच्या एखाद्या गोष्टीबद्दलची नापसंती तोंडावर दाखवू नये.
शेजारच्यांशी जवळीक साधताना स्वत:हून त्यांच्या वैयक्तिक बाबींबद्दल नसते प्रश्न करू नये.
अडचणींच्या वेळेस त्यांच्याकडून पैसे घेतले असल्यास ते वेळेत परत करावे.
शेजारच्यांनी एखादा पदार्थ दिल्यास त्याला नावे ठेवू नयेत.
साखर, मिरच्या, मीठ, बटाटे अशा बारीकसारीक वस्तूंची सारखी मागणी करू नये.
एका शेजार्‍याची चुगली दुसर्‍याकडे करू नये.
शेजारच्यांच्या सुख-दुखात सामील होताना आपले वर्तन संयमित ठेवावे. ते दुखावले जातील अशा पद्धतीने वागू नका.
बर्‍याच स्त्रिया आपले बाळ शेजारच्यांकडे सोपवून बाहेर जातात. एखाद दिवस ठीक आहे पण रोज असे करू नका.
जेवण्याच्या वेळी शेजारच्या घरात जाऊन बसू नये.
शेजारच्या घरात जाऊन त्यांच्या स्वयंपाकघरातील वा इतर कुठल्याही सामानाला हात लावू नये. अगदी फारच गरज असल्यास तरच प्रेस, मिक्सर, सिलेंडर, हिटर अशा वस्तू शेजारच्यांकडे मागाव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi