Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिळवा खास अँरोमा

मिळवा खास अँरोमा
दिवसभरातल्या धावपळीत होणारा प्रदूषणाचा, रहदारीचा त्रास, बसमधल्या गर्दीचा घामट वास यामुळे अगदी त्रासून जायला होते. हा वास उबग आणणारा आहे. याप्रमाणेच गर्दीच्या किचकिचाटात स्वत:च्या अंगाला येणारा उग्र दर्पही नकोसा वाटतो. घरातला कुबटपणाही असाच जाचणारा. पण आता अँरोमा थेरपीतले मंद सुवास आपलेसे करून या त्रासापासून मुक्ती मिळवता येते.

घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी आता अँरोमा थेरपीचा वापर केला जाऊ लागलाय. इसेन्शियल ऑईल पाण्यात मिसळून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. फ्रीज किंवा टेबलची स्वच्छता करताना हे मिश्रण वापरल्यास काम सोपे होईल आणि छानसा सुगंधही दरवळेल.

घरातले कपडे, बेडशीट्स, चादरी धुताना साबण पावडरबरोबर निलगिरी किंवा लव्हेंडर तेलाचे काही थेंब घाला. त्याचा मंद सुगंध प्रसन्नता देतोच त्याचबरोबर त्यावर तयार होणारे जिवाणूही नष्ट होतात.

इस्त्री करताना कपड्यांवर इसेन्शियल ऑईल शिंपडता येईल. घरात पाळीव प्राणी असणार्‍यांनी तर आवर्जून या तेलाचा वापर करावा म्हणजे वेगळी काळजी घ्यावी लागणार नाही. स्वच्छतेप्रमाणे मन प्रसन्न करण्यासाठीही या तेलाचा चांगला उपयोग होतो.

देवघरात सुगंधी तेलाचे थेंब टाकल्यास वावरताना दरवळणारा सुगंध मनाला गारवा देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi