Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 6 टिप्सच्या मदतीने तुम्ही सांभाळू शकता तुमचे WEDDING DRESS

या 6 टिप्सच्या मदतीने तुम्ही सांभाळू शकता तुमचे WEDDING DRESS
लग्नाअगोदर कपड्यांची निवड करण्यासाठी फार वेळ दिला जातो, पण समारंभ झाल्यावर कपड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. एका विशेषज्ञाचे म्हणणे आहे की लग्न समारंभानंतर हे ड्रेस ड्राय क्लीनिंगला जरूर द्या आणि त्याला नंतर मऊ कपड्यात घडी करून ठेवा. 
वैवाहिक पोशाखांना आवरून ठेवण्यासाठी काही टिप्स -
 
1- आपल्या लग्नाचे परिधान कधीही अशा जागेवर ठेवू नये, जेथे तापमान किंवा आंद्रता बदलत राहते.
2- याला धूळ व प्रकाशापासून बचाव करण्यासाठी मऊ कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवावे. लपेटून ठेवा.
3- परिधानाला बाहेर टांगण्या ऐवजी अल्मारीत हँगरवर लावून ठेवावे. असे केल्याने कपड्याच्या लुक खराब होणार नाही.

4- समारंभात घातल्यानंतर लगेचच पोशाख ड्राय क्लीनिंगला द्या, ज्याने त्याच्यावर डाग पडणार नाही आणि त्याची चमकही फिकी पडणार नाही.  
5- प्रवासादरम्यान आपल्या वैवाहिक परिधानाच्या महत्त्वाच्या भागाला ऍसिड-फ्री व रंग न सोडणारे टिशूने कव्हर करा. तुम्ही परिधानाच्या घडीमध्ये टिशू पेपर लावू शकता, ज्याने त्याची क्रीज खराब होणार नाही.  
6- पोशाखाला योग्य बॉक्स किंवा पेटीत ठेवण्याअगोदर या कामासाठी विशेषज्ञ व्यक्तीची मदत नक्की घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिस्पी बांगडा फ्राय