Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वॉशिंग मशीनची स्वच्छता कशी कराल?

वॉशिंग मशीनची स्वच्छता कशी कराल?

वेबदुनिया

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूमच्या जवळच वॉशिंग मशिन ठेवलं पाहिजे. जेणोकरून वॉशिंग मशिनमध्ये पाणी सहज भरता येईल आणि कपडे धुतल्यानंतरचं सांडपाणीही सहज बाथरूममध्ये टाकता येईल. धातूची बटणं आणि झिप्स असणारे कपडे वेगळे धुवावे. तसंच हलक्या रंगाचे कपडेही वेगळे धुवावे. सिल्कचे कपडे वेगळे धुवावे. सगळे कपडे एकत्र टाकल्यामुळे कपडे स्वच्छ निघण्याऐवजी खराब होण्याचीच अधिक शक्यता असते.

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना ब्लिच किंवा तत्सम रसायनं कधीही वापरू नका. त्यामुळे वॉशिंग मशिन आणि कपडे खराब होऊ शकतात.

रोज वॉशिंग मशिन वापरत असाल तर दहा-पंधरा दिवसांतून एकदा मशिनमध्ये पाणी भरून ड्रेन करून टाकावं. म्हणजे वॉशिंग मशिनच्या टबमध्ये कुठे काही साबण राहिला असेल तर तो निघून जाईल.

कपडे धुतल्यावर वॉशिंग मशिनमध्ये तसेच ठेवू नका. त्यांना कुबट वास येतो. आणि तो वास वाळल्यानंतरही जात नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi