Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुंदर वॉलपॅनेल्स भिंती

सुंदर वॉलपॅनेल्स भिंती

वेबदुनिया

सजवण्यासाठी जसा रंगांचा उपयोग होतो, तसाच वॉल पेपर, पोस्टर्स, फिल्म आणि कपड्यांची पॅनेल्स यांचा उपयोग होऊ शकतो. विविध प्रकारचे, रंगांचे, टेक्श्चरचे आणि किमतींचे वॉल पेपर बाजारात उपलब्ध आहेत. यासाठी आपल्या भिंती मात्र लांबी भरून गुळगुळीत करून घ्याव्या लागतात. त्यावर सोल्युशन लावून पेपर लावला की, झली भिंत तयार! अगदी सात-आठ रुपये चौरस फुटांपासून हे पेपर उपलब्ध आहते, मात्र टिकण्याच्या दृष्टीने करूनच त्यांचा वापर केला पाहिजे, शिवाय ते ओल्या फडक्याने पुसता आले पाहिजेत.

याचप्रमाणे विविध नैसर्गिक देखावे असणारे अत्यंत नयनमनोहर असे वॉल पोस्टर्स मिळतात, तेही वॉल पेपरच असतात. यांचा वापर करून त्यावर जर सुयोग्य असे लायटिंग केले तर खोलीचा आकार, माप, खिड्या प्रकाण यांचा सांगोपांग विचार केला पाहिजे, नाही तर खोली बेढब दिसू शकते. याचप्रमाणे लाकूड किंवा प्यालवूडचा वापर करून भिंतीवर पॅनेल तयार करता येते किंवा आपल्याला हव्या त्या कापडाचा वापर करून भिंत सजवता येते. प्लायवूडऐवजी सॉफ्टबोर्ड वापरल्यास त्याचा पिनअप बोर्ड म्हणूनही वापर करता येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'गुळवेल' म्हणजेच अमृतकुंभ!