Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हँगिंग बास्केटने सजवा बालकनी!

हँगिंग बास्केटने सजवा बालकनी!

वेबदुनिया

वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधन संपत्ती कमी पडू लागली आहे. शहरांचा झपाट्याने विकास होत असून बगीचे, शेती नाहिशी होत असले तरी शहरातील बंगल्यात नंदनवन फुलू लागले आहे. कमी जागेत घर बांधतांना बगीचाचे ही प्लॅनिंग केले जात आहे. परंतु मुंबई सारख्या महानगरात रोपट्यांची कुंडी ठेवण्या इतकी‍ ही जागा शिल्लक नसते. अशा परिस्थितीत हॅंगिंग बास्केटने घराची बाल्कनी व टॅरेस सजू लागले आहे. 

महानगरात बहुतेक घरामध्ये हॅंगिंग बास्केट लावले दिसतात. परंतु काही मोजक्यात बास्केटमध्ये रोपटे जगताना दिसते. तर काही‍ बास्केट या केवळ टांगलेल्या दिसतात. रोपटे योग्य पध्दतीने जगविले पाहिजे. हॅगिंग बास्केटमध्ये रोपटे लावण्यासाठी काही टिप्स....

* पावसाळा हा ऋतु रोपटे लावण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ आहे.

* हँगिंग बास्केटमध्ये रोपटे लावण्यासाठी बास्केट किंवा कुंडीचा आकार 14 इंचापेक्षा कमी नसावा.

* प्लॅस्टिक मध्ये बहुरंगी बास्केट बाजारात उपलब्ध असतात. त्यात आपण जाळीदार बास्केट उपयोगात आणू शकाल. कारण बास्केटला जाळी असल्याने रोपट्याला पुरेशी हवा व सूर्यप्रकाश मिळू शकतो.

* जागेअनुरूप बास्केटची निवड करावी. बाल्कनीच्या एका कोपर्‍यापासून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत एका आकारात बास्केट टांगाव्यात.
बाल्कनीत बास्केटची गर्दी करू नये.

* हँगिंग बास्केटमध्ये लहान उंचीचेच रोपटे लावावे. उदा. वेल, फुल झाडे इ.

* स्वीटएलाइसम, वरवीना, पिटुनिया, नस्टरसियम पोर्तुलाका, टोरोन्सिया, फर्न इत्यादी प्रकाराचे रोपटे बास्केटमध्ये लावावित.

* बास्केट ठेवताना अशा पध्दतीने ठेवावी की, त्याची देखरेख चांगल्या पध्दतीने होईल.

* रोपट्यांना पाणी‍ देताना काळजी घेतली पाहिजे. रोपावर पाणी टाकावे. त्याने रोपट्याची पाने स्वच्छ होतात. रोपट्यांना 'स्प्रे' पंपाने पाणी देणे फायदेशिर ठरते.

* बास्केटमध्ये छोटी रोपटे लावल्याने रोपट्यांची पानेही कमी गळतात व बाल्कनीत कचराही कमी होतो. कमी जागेत छान बाग सजविता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेयसीला असे खुश ठेवा