Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Anti aging food 10 पदार्थ तुम्हाला तरुण ठेवतील

Anti aging food 10 पदार्थ तुम्हाला तरुण ठेवतील
जगात असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्याने चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडत नाहीत. यामुळे तुम्ही कायम तरुण राहाल. संशोधन देखील असे आढळून आले आहे की प्राचीन लोक ओमेगा 3 आणि जिनसेंग असलेले पदार्थ खात असत. हे खाल्ल्याने ते दीर्घकाळ मजबूत राहत असत.
 
1. पपई -  पपई आपली डेड स्किन हटवण्यात मदत करतं. ज्याने त्वचा चमकदार होते आणि ग्लो करते. यात पपाइन नावाचे एंजाइम आपल्याला दीर्घायु बनवण्यात मदत करतात.
 
2. डाळिंब - डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब रक्त शुद्ध करण्यासोबतच शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढवते. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण फळ आहे.
 
3. ब्रोकली : यात व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर आणि कॅल्शियम आढळतं ज्याने पोट साफ राहतं आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
 
4. मासे: माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, त्यामुळे योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्वचा तरुण राहते.
 
5. टोमॅटो: हे देखील एंटी एजिंग फूड आहे. त्यात लाइकोपीन असते. याशिवाय त्वचेला तरुण ठेवणारे सर्व अँटिऑक्सिडंट्स यामध्ये असतात.
 
6. ब्लूबेरी: त्यात भरपूर जीवनसत्त्वे अ आणि क असतात आणि त्यात अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडेंट देखील असते. त्वचेचे वय कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. हे कायम तरुण ठेवण्यास सक्षम आहे.
 
7. पालक : यात आयरनसोबत फॉलिक अॅसिड आढळतं ज्याने डीएनए रिपेयर करण्यास मदत होते, त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रियाही मंदावते. हे डोळ्यांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.
 
8. ड्राय फूड : ड्राय फूडमध्ये बदाम, मनुका, शेंगदाणे, खुबानी, खजूर आणि अक्रोड हे असे ड्राय फ्रूट्स आहेत जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी तसेच तरुण राहण्यास मदत करतात.
 
9. दही : दह्याला देखील एंटी एजिंग फूडमध्ये सामील केलं जातं. याचे नियमाने सेवन केल्याने एजिंग प्रोसेस अचानक मंद होऊ लागते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे.
 
10. जिनसेंग : जिनसेंग हे सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. त्याची मुळे आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. हे बाजारात थेट मिळत नसून टॅब्लेट किंवा टॉनिकमध्ये उपलब्ध असते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या 
 
फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga for weight los या योगासनांमुळे लठ्ठपणापासून सुटका होईल