Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉन्ग डिस्टन्स नात्यात या चुका होऊ शकतात, अशी काळजी घ्या

लॉन्ग  डिस्टन्स नात्यात या चुका होऊ शकतात, अशी काळजी घ्या
, रविवार, 7 मार्च 2021 (08:00 IST)
एकेकाळी गल्लीतल्या मुला -मुलींचे एकमेकांवर प्रेम होत होतें . बाहेर जाऊन भेटणे, छतावर जाऊन भेटणे आता हे काहीच नाही. सध्याच्या काळात लॉन्ग डिस्टन्स नात्याचा कल वाढला आहे. आजच्या युगात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटत आहे. सोशल मीडिया वर मैत्री होऊन प्रेम फुलत आहे. चॅट, फोन, ईमेल या माध्यमातून चॅट केला जात आहे. परंतु या नात्यात बरेच तोटे देखील आहेत . चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1अनोळखी लोकांशी दूर राहावे. -
* लोक भेटतात आणि नंतर सोशल मीडियावर आपले प्रेम दर्शवतात.त्याचे बरेच नुकसान आहे. आपण या प्लॅटफॉर्मवर एखाद्याशी मैत्री करता आणि त्याच्या प्रेमात पडता.असं करणे हानिकारक होऊ शकते.असे अपरिचित किंवा अनोळखी लोकांशी दूर राहावे हे आपल्या काहीच कामी येणार नाही हे आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणून अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापूर्वी सजग राहावे. सावध राहावे.   
 
2ऑनलाईन फ्रॉड पासून सावध राहा- 
बऱ्याच वेळा आपण असे ऐकतो की लोकांसह ऑनलाईन फ्रॉड होतात. त्यांच्या खात्यातून न कळत पैसे निघून जातात असे फ्रॉड लॉन्ग डिस्टन्स नात्यात देखील होऊ शकते. एखाद्याने आपल्याशी मैत्री निव्वळ आपल्या पैसे लुबाडण्यासाठी केली असू शकते. आपण एकदा काय त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला की तो व्यक्ती आपल्याकडून पैसे मागेल आणि आपण नकळत त्याच्या जाळ्यात अडकून त्याला पैसे देता आणि तो आपले पैसे घेऊन पाळून जातो कधीही परत न येण्यासाठी. आणि आपण त्याला शोधत बसता.  
 
3 ऑनलाईन रोमांस करणे चुकीचे -
जर आपली एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियावर मैत्री नंतर प्रेम झाले असल्यास तर आपण चुकून देखील ऑनलाईन रोमांस करू नका. कारण असे लोक फसवे असतात ते कोणत्याही कारणावरून ब्लँकमेल करू शकतात. म्हणून आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.त्या व्यक्तीशी कशा प्रकारे देखील ऑनलाईन रोमांस करावयाचे नाही,कारण आपली केलेली एक चूक आपल्याला महागात पडू शकते. 
 
4 फसवणूक होऊ शकते -
बऱ्याचदा असे बघितले आहे की लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये मुली फसतात. असे घडते की दोघेही वेग वेगळ्या ठिकाणी आहे,कोण काय करीत आहे एकमेकांचे काहीच माहीत नाही.अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला जो पर्यंत आपल्याशी काम आहे तो गोड बोलून आपल्याला फसवेल.लॉन्ग डिस्टन्सच्या नात्यात फसवेगिरी होऊ शकते. म्हणून अशा प्रकारच्या नात्यात सावधगिरी बाळगा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगासनाचे नियम- योगासनाचे नियम पाळा निरोगी राहा