Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑईली स्कीनची काळजी कशी घ्याल!

ऑईली स्कीनची काळजी कशी घ्याल!
* त्वचा ऑईली असल्यास क्लिन्झींगला पर्याय नाही. क्लिन्झींगमुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीसे होऊन रंध्रे मोकळी होतात. या उपायाने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवडय़ातून एकदा लाईट स्क्रब केल्याने फायदा होतो.
* ऑईल फ्री फेसवॉश नियमित वापरल्यास त्वचा ऑईल फ्री राहते. ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर करू नका.
* तांदळाच्या पिठीमध्ये पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेहर्‍यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा. दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून पॅक काढून टाकावा. 
* पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टॉनिक ठेवा. त्याबरोबर वेट टिश्युजही हवेत. दर दोन तासांनी यानं चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते.
* ऑईली स्किनवर अँकनेचा त्रास होत असेल तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल मॉईश्चरायझर वापरणं चांगलं.
* त्वचेचं सीबम ऑईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वज्र्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनशापोटी ही फळं खा