Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Breast Pain मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना का होतात? जाणून घ्या उपाय

breast pain
, गुरूवार, 4 जानेवारी 2024 (09:59 IST)
Breast Pain मासिक पाळीच्या दिवसात महिलांना खूप काही समस्या येतात. खूप साऱ्या महिलांचे पाळीच्या दिवसात अंग दुखते तर कही महिलांचे पोट दुखते तर कही महिलांची कंबर दुखते. मासिक पाळीच्या दिवसात हार्मोन्स मध्ये परिवर्तन होते त्यामुळे शरीरात काही समस्या उद्भवतात. त्यामुळे अनेक महिलांना मासिक पाळीच्या आधी किंवा त्या दरम्यान ब्रेस्ट पेन ही समस्या निर्माण होते. ब्रेस्ट पेन बरोबर सूज आणि अस्वस्थता जाणवते. अशात खूप महिलांना प्रश्न असतो की मासिक पाळीच्या आधी ब्रेस्ट पेन का होते तर जाणून घेऊया त्याची कारणे व उपाय -
 
मासिक पाळीच्या आधी ब्रेस्ट पेन का होते ? 
मासिक पाळीच्या सुरु होणाच्याआधी ब्रेस्ट पेनला मेडिकल टर्म मधे cyclical mastalgia म्हटले जाते. मासिक पाळीच्यापूर्वी स्तनांवर सूज येते व अस्वस्थ होते आपल्या शरीरात हार्मोन्स बदल झाल्याने ब्रेस्ट पेन होणे तसेच सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. मासिक पाळीच्या दरम्यान एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरान नावाचे दोन रिप्रोडक्टिव हार्मोन बदलतात.
 
मासिक पाळीच्या एक ते दोन आठवडे पूर्वी एस्ट्रोजन हार्मोन वाढायला लागते ज्यामुळे ब्रेस्टला सूज येण्याची समस्या वाढते. तसेच त्या सोबत प्रोजेस्टोरान वाढल्यामुळे ब्रेस्टच्या मिल्क ग्लँडमध्ये सूज यायला लागते. 
 
सोबत या हार्मोन्समुळे ब्रेस्ट पेन ही समस्या निर्माण होते. हे हार्मोन पोटात अणि ब्रेस्ट मध्ये पाणी जमा करते. ज्यामुळे पोट फुललेले दिसते व तसेच ब्रा बदलताना अस्वस्थता जाणवते.
 
ब्रेस्ट पेन होत असल्यास घरघूती उपचार जाणून घेऊया -
१. मसाज : ब्रेस्ट पेनला कमी करण्यासाठी आपण मसाज पण करू शकतो. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते ज्यामुळे सूज व दुखणे या पासून आराम मिळतो. आपण गरम पाण्याने अंघोळ करताना ब्रेस्टची हळुवार मसाज करू शकता. 

२. बर्फाने शेकणे : बर्फाने शेकल्याने ब्रेस्ट पेन पासून लवकर आराम मिळतो. तसेच बर्फाचा तसाच वापर करायचा नाही. एखादया प्लास्टिक पिशवी किंवा कॉटनच्या कपड्यात बर्फाला ठेउन मग मसाज करायचा. बर्फाला कमीत कमी आपण दहा मिनिट ब्रेस्ट वर लावून ठेवल्यास आपणाला दुखण्यापासून लवकर आराम मिळेल. 
 
३. बडीशेपचे सेवन : मासिक पाळी येण्याअगोदर किंवा आल्यावर बडीशेप सेवन करणे खूप चांगले असते. याने हार्मोनला संतुलित करण्यास मदत होते. ज्यामुळे दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. या करीता आपण बडीशेपाचे पाणी देखील सेवन करू शकतात.
 
४. व्हिटॅमिन E चे सेवन : व्हिटॅमिन E ब्रेस्ट पेनच्या समस्येमध्ये आराम देण्यासाठी उपयोगी आहे. आपण आपल्या डायटमध्ये व्हिटॅमिन E चा वापर करू शकतात. यासाठी आपण सुरजमुखीच्या बिया, पनीर बटर,
भोपळ्याच्या बिया हे आहारात सामील करु शकता.
 
५. मिठाचे सेवन कमी करणे : मीठ हे ब्रेस्ट पेनला वाढवू शकते. यासाठी याचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने ब्रेस्ट मध्ये पाणी जमा होते. ज्यामुळे सूज येणे यासारखी समस्या वाढते. 
 
यासाठी आहारात मिठाचा वापार करणे तसेच फास्ट फूड, मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ याचे सेवन करणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Aloo Baingan भारतीय भाजीचा जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश