Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KItchen Tips :पावसाळ्यात फ्रिजमध्ये लागलेली बुरशी अशी स्वच्छ करा

KItchen Tips :पावसाळ्यात फ्रिजमध्ये लागलेली बुरशी अशी स्वच्छ करा
, मंगळवार, 5 जुलै 2022 (22:09 IST)
पावसाळ्यात घराच्या भिंती, दरवाजे आणि इतर अनेक ठिकाणी बुरशी येणे हे अगदी सामान्य आहे. यामागील कारण सहसा ओलावा असतो, पण आज आम्ही तुम्हाला फ्रीजमध्ये बुरशी का पावसाळ्यात बर्‍याच वेळा तुमच्या लक्षात आले असेल की फ्रीजमध्ये बुरशी निर्माण होऊ लागते, जी साफ करूनही सहजासहजी साफ होत नाही. खूप प्रयत्नांनंतर थोडी जरी साफ झाली तरी काही दिवसांनी पुन्हा बुरशी येऊ लागते. फ्रिजमध्ये बुरशी कशी काय लागते आणि ती स्वच्छ कशी करावी जाणून घेऊ या.
 
फ्रीजमध्ये बुरशी येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये शिळे अन्न अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवणे, फ्रीज अनेक दिवस बंद ठेवणे, फ्रीज वारंवार बंद करणे, फ्रिजमधील फळे आणि भाज्या सडणे आणि वेळोवेळी साफ न करणे यांचा समावेश आहे. 
फ्रीजमधील बुरशीमुळे फ्रीज अस्वच्छ दिसतो, त्यात ठेवल्याने अन्नपदार्थही खराब होऊ लागतात, जे आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक असतात 
 
फ्रीजमधून खराब झालेले अन्न वेळोवेळी काढून टाका
. बर्‍याच वेळा आपण फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो आणि फ्रीजमध्ये काय ठेवले आहे याची आपल्याला आठवण नसते. वापर न केल्यामुळे हे अन्न अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवून खराब होत राहते. त्यामुळे दोन-चार दिवसांत फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
 
डिश वॉश आणि गरम पाण्याचा वापर करा,
दर पंधरा दिवसांनी फ्रीज साफ करा. प्रथम फ्रीजमध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू बाहेर काढा. यानंतर फ्रीजचे सर्व भाग जसे की बर्फाचा ट्रे, अंड्याचा ट्रे, भाजीची टोपली, ड्रॉवर्स बाहेर काढा. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात दोन चमचे डिश वॉश टाका. नंतर त्यात फेस किंवा सुती कापड भिजवून फ्रीज स्वच्छ करा. त्यानंतर फ्रिज कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करा. जे भाग बाहेर काढले आहेत ते ठेवा, डिश वॉशच्या मदतीने ते चांगले धुवा आणि कोरडे करा, नंतर ते पुसून फ्रीजमध्ये ठेवा.
 
रेफ्रिजरेटरचे गॅस्केट म्हणजेच रेफ्रिजरेटरच्या दरवाजाला जोडलेले रबर साफ करण्यासाठी त्यावर पांढरा व्हिनेगर फवारून पाच मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून लिक्विड तयार करा. नंतर सुती कापडाची मदत घेऊन ते द्रावणात भिजवा आणि गॅस्केटच्या आतील पृष्ठभाग स्वच्छ करा. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून टाका. यामुळे फंगस निघून जाईल तसेच फ्रीजही चमकू लागेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in BA Political Science After 12th : बॅचलर ऑफ आर्ट्स इन पॉलिटिकल सायन्स मध्ये करिअर