असा निवडा गालिचा
जुनी झाली की फरशीची चमक कमी होते. काळपटपणा वाढू लागतो. धूळ आतपर्यंत अडकून राहते. अशी नजरेला त्रास देणारी फरशी झाकून टाकण्यासाठी गालिचा घालणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. घरासाठी गालिका निवडताना जीवनशैली आणि अवडीनिवडी यांचा मेळ साधणं गरजेचं ठरतं. घराच्या आसपास धूळ असेल तर सहज धुता येईल असा गालिचा निवडा. सजावटीच्या दृष्टीकोनातून लोकरीचा गालिका निवडणं योग्य ठरेल.
कशी करावी साजरी सजावट
बैठकीच्या खोलीतल्या फर्निचरच्या त्याच त्याच मांडणीला कंटाळा आला असेल तर मांडणी बदलून बगायला हरकत नाही. घरातील एखादी विशेष वस्तू हायलाईट करायची असेल तर दिव्यांनी सजावट करा. कलात्मकता जपण्यासाठी सजावटीत सिल्क प्लांटचा उपयोग करता येऊ शकतो. ही कृत्रीम हिरवीगार रोपटी खोलीच्या सौंदर्यात मोलाची भर घालतात.