झोप येत असल्यास फळांचे सेवन करावे किंवा ज्यूसचे सेवन करावे. जेवण केल्यानंतर थोडावेळ फिरावे. तसेच संगीत ऐकल्याने झोप येत नाही. ऑफिसमध्ये लंच नंतर झोप येत असल्याचे कारण हे आहे की, तुमचे शरीर थकलेले आहे. जेवण केल्यानंतर अनेक लोकांना झोप येते. यामुळे कामात लक्ष लागत नाही. यामुळे काम पेंडिंग राहते आणि वेळेवर पूर्ण होत नाही. तसेच नविन काम करणे देखील कठीण जाते. याकरिता लंच नंतर झोप येऊ नये म्हणून या टिप्स अवलंबवा.
1. फळ खावे किंवा ज्यूस प्यावे-
एक आरोग्यदायी आणि पोषणने भरपूर डाइट तुमच्या उर्जेला चालना देईल आणि तुम्हाला सुस्ती येण्यापासून दूर ठेवेल. लंच नंतर एक सफरचंद, केळे किंवा इतर कोणतेही तुमचे आवडते फळ सेवन करावे किंवा फळांचे ताजे ज्यूस देखील फायदेशीर असते.
2. थोडावेळ चालावे किंवा योग करावा-
तुमच्या ऑफिसमध्ये लंच नंतर थोडावेळ चालावे किंवा योग करावा. हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय तुम्हाला ताजेपणा देईल तसेच आरोग्य देखील चांगले राहिल
3. कमी जेवण करावे-
लंचनंतर झोप येण्याचे मुख्य कारण आहे की आपण गरजेपेक्षा जास्त जेवण करतो. अश्यावेळेस जेवढी भूक असेल त्यापेक्षा एक पोळी कमी खावी. भात, पनीर यांसारखे जड पदार्थ टाळावे जर तुम्ही नाश्ता पोटभर करत असाल तर लंच कमी करावा.
4. संगीत ऐका-
लंचनंतर काही वेळ संगीत ऐकावे. संगीत तुमच्या मनाला ताजे तवाने करेल तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे निवडून ते ऐकावे त्यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल व कामात देखील लक्ष लागेल.
5. कलरफुल वस्तू बघा-
ही एक खूप क्रिएटिव आईडिया आहे तुम्हाला झोप येऊ नये म्हणून आपल्या डेस्कटॉप, मोबाइल, पुस्तक किंवा ऑफिसच्या बाहेर बागीच्या मध्ये सुंदर डार्क रंग पहा. अश्याने तुमच्या मेंदु सक्रिय होईल. सोबतच वाइब्रेंट आणि सुंदर रंग पहिल्याने डोक्यामध्ये डोपामाइन रिलीज़ होतो. अश्यावेळेस चांगले फोटो पहा किंवा बागीच्यातील सुंदर फुले पहा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी
संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik