पीरियड्स दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असतं.
पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एकाबाजूला पोट दुखी तर दुसर्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता.
हलका व्यायाम करावा. अनेक लोकांप्रमाणे या दरम्यान अधिक शारीरिक श्रम घेतल्याने अधिक ब्लीडिंग होते अशात डॉक्टर्स देखील हलका व्यायाम करण्याचा सल्ला देतात. अशात या दरम्यान कोणते व्यायाम करावे हे शेड्यूल करावे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्ट्रेचिंग करणे टाळावे. तसेच या दरम्यान व्यायामापेक्षा योगा करणे अधिक फायदेशीर ठरेल. याने वेदना सहन करण्याची क्षमता वाढेल आणि फ्रेश वाटेल. तरी शीर्षासन, सर्वांगासान, कपालभाति सारखे आसन करू नये.
या दरम्यान प्राणायाम आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. तसेच अनुलोम- विलोम केल्याने हलकं जाणवेल. हलका व्यायाम आणि योगा केल्याने स्वत:ला फिट जाणवेल आणि नियमही मोडणार नाही.
पीरियड्स सुरू होण्यापूर्वी मूड स्विंग होणे अगदी सामान्य आहे. अशात अनेक बायका चिडचिड करू लागतात तर काहींना डिप्रेशन जाणवतं. अशात सुरुवातीला दोन-तीन दिवस मेडिटेशन केल्याने मूड चांगला राहण्यास मदत मिळेल.