सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आणि बऱ्याच वेळा काही मिळविण्याच्या मार्गात अपयश आल्यावर निराश होतो. असं वाटू लागते की आयुष्यात अडथळेच जास्त आहेत. त्या मुळे तणाव वाढतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कमी वयातच उच्चरक्तदाब आणि इतर आजार वेढतात. असं होऊ नये या साठी आयुष्यात काही क्षण स्वतःसाठी द्या स्वतःसाठी जगा आणि आनंदी राहा.आनंदी कसे राहायचे या साठी काही टिप्स सांगत आहोत .
* काही वेळ स्वतःसह-आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सर्वात आवश्यक आहे स्वतःसाठी वेळ काढणे, ऑफिसच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आपल्याकडे सर्वकाही करायला वेळ असतो पण स्वतःसाठी वेळ नसतो. काही वेळ स्वतःसह देखील घालवा. आपल्या आवडीच्या छ्न्दाला निवडा आणि काही वेळ आपल्या छंदासाठी काढा.
* छोट्या-छोट्या गोष्टींना दुर्लक्षित करा - आयुष्यात चढ उतार येतातच, अशा परिस्थितीत छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्षित करावे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने आपल्याला मनस्ताप होईल आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. म्हणून सकारात्मक राहा आणि निराश होऊ नका.
* आनंद साजरा करा- आपण आपल्या मित्रांसह किंवा कुटुंबियांसह आनंद साजरा करा. असं केल्याने आपले आनंद द्विगुणित होईल.
* उदास आणि निराश होऊ नका- बऱ्याच वेळा आयुष्यात आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही. त्या साठी उदास आणि नैराश्य येऊ देऊ नका. जे आयुष्यात मिळत आहे ते स्वीकार करून पुढे वाढा.
* सोबती ठेवा- सर्वप्रथम आपले लक्ष्य निर्धारित करा, करियरच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात आपला साथ देणारे असे अनेक लोक आहे जे आपल्यावर प्रेम करतात. त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या माणसांची सोबत आपल्याला आनंदी ठेवेल.