Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यश मिळविण्याचे असल्यास हे सोपे टिप्स अवलंबवा

यश मिळविण्याचे असल्यास हे सोपे टिप्स अवलंबवा
, शुक्रवार, 21 मे 2021 (17:24 IST)
आपण आपल्या मेंदूचे वापर योग्यरीत्या केले तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून यशाच्या प्राप्तीसाठी लक्ष केंद्रित करावे. या साठी काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या.
 
1 मेंदूवर जोर द्या-दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या संपूर्ण दिवसाच्या क्रियाकलापांवर विचार केले पाहिजे. प्रत्येक लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. या मुळे मेंदू बळकट होतो.आज दिवसभरात काय केले,काय नवीन शिकायला मिळाले,मेंदूचा वापर कुठे जास्त केला ? अशा गोष्टींना आठवा. ज्यांना आपण दिवसभरात भेटला त्यांच्या नावाची पुनरावृत्ती करा.
 
2 तणावापासून लांब राहा- तणाव हे मेंदूला क्षती पोहोचवतो.कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. तणाव घेतल्यामुळे मेंदू काम करत नाही. ज्या गोष्टी आपल्यासाठी ताण वाढविणाऱ्या आहे त्यांना आपल्यापासून लांब ठेवा. काही काळ मेंदूला शांत ठेवा. 
 
3 मल्टिटास्किंग काम करू नका- बऱ्याच वेळा काही लोकांना असे वाटते की एकत्ररित्या बरेच काम केल्याने वेळ वाचतो. परंतु असं केल्याने मेंदूवर जोर पडतो आणि त्याचे नुकसान होते. आपले मेंदू एक काम एकाच वेळात पूर्ण करतो. तर व्यावसायिक जीवनात मल्टिटास्किंग हे चांगले मानले आहे. या सवयीमुळे शिकण्याची सवय नाहीशी होते आणि आपण एखाद्या यंत्रणे प्रमाणे काम करतो.   
 
4 मेंदूला नेहमी सक्रिय ठेवा- संशोधन सांगतात की स्वतःला जेवढे व्यस्त ठेवाल मेंदू ठेवढे अधिक सक्रिय होत. मेंदू देखील शरीराच्या इतर अवयवांसारखे असते. जर आपण व्यायाम केले नाही तर शरीर मजबूत बनत नाही. त्याच प्रमाणे जर मेंदूला चालना दिली नाही तर हे मंदावत. दररोज नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा. 
 
* मेंदूशी बोला - आपल्याला आपले कार्य लिहून ठेवायला पाहिजे. आपल्या जीवनात काय लक्ष आहे ते देखील लिहून ठेवावे. जर आपण अशी सवय लावली तर आपल्या मेंदू ला हे समजेल की आता पुढे काय करायचे आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हातांची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम करा