Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

घराला आरामात क्लीनिंग करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

house
, मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (20:00 IST)
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतासाठी सुद्धा वेळ नसतो. तर घरातील कामांसाठी कसा वेळ काढतील? अनेक लोक हॉउस हेल्पर किंवा मेड ची व्यवस्था करतात. चला तर मग या टिप्स जाणून घ्या ज्यामुळे तुम्ही आरामात घर क्लीनिंग करू शकाल . 
 
घरात सामान कमी ठेवणे- प्रत्येकाला नवीन वस्तु विकत घेण्याची आवड असते. त्यामुळे घरातील जागा घेरली जाते. तुम्ही जेव्हा पण कुठला सामान विकत घ्यायला जाल तेव्हा लक्ष ठेवा की सामान घरातील जागा कमी घेईल. आणि ती वस्तु जास्त वापरली जाईल. 
 
सकाळी उठल्यावर आपले आवरून ठेवणे-  काही लोकांची सवय असते की, ते सकाळी उठल्यावर अंथरूण तसेच पडू देतात. आणि दुसऱ्या कामात व्यस्त होतात. त्यामुळे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हाच अंथरूण आवरून घेणे. त्यामुळे नंतर मेहनत करावी लागणार नाही.

डस्ट मोब स्लिपर घालणे- बाजारात अशी स्लिपर मिळते. जी कचऱ्याला साफ करते. जर तुम्हाला झाड़ू लावायला त्रास होत असेल तर किंवा तुमच्या कडून वाकले जात नसेल तर तुम्ही डस्ट मोब स्लिपरचा उपयोग करू  शकतात. यात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. चालता-फिरता पूर्ण घराची साफसफाई होईल 
 
डोर मेटचा वापर करणे- जर तुम्ही डोर मेटचा वापर करत असाल तर अर्धा कचरा घरच्या बाहेर राहील. डोर मेटला महिन्यातून एकदाच धुतले तरी चालेल. याकरिता शक्य झाल्यास घरात कमीतकमी 2-3 डोर मेट आणून ठेवावे . 
 
जेवण बनवतांना स्वच्छता करणे -  एका खास गोष्ट लक्षात ठेवणे जेव्हा पण तुम्ही जेवण बनवत असाल त्याच वेळेला किचन स्वच्छ करणे. यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला परत परत साफसफाई करायला उठावे लागणार नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आळशीच्या बिया बनवतील केस सिल्की, जाणून घ्या उपयोग कसा करायचा