कोरोना काळात बऱ्याच लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. काहींनी छोटे व्यवसाय सुरु केले आहेत. या साथीच्या रोगाच्या वेळी लोकांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म अधिक चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. आपण आपल्या लहान व्यवसायाला यशस्वी बनविण्यासाठी काही टिप्स अवलंबवावे जेणे करून आपल्याला व्यवसायात अधिक यश मिळेल .
* प्रामाणिक रिव्ह्यू - बऱ्याच वेबसाईट्स अशा आहेत ज्या लोकांना आपले रिव्ह्यू देण्यासाठी सांगतात . आपण देखील आपल्या व्यवसायासाठी रिव्ह्यू कॉलम देऊ शकता .आपण अलीकडेच नवीन व्यवसाय सुरु केले आहेत तर रिव्ह्यू मिळाल्याने आपल्या व्यवसायाकडे लोकांचे लक्ष सहज जाईल.
* सोशल मीडिया प्लॅटफॉर्म -सध्या काही लहान कंपनीने सोशल मीडियावर पेज बनविले आहे. या मुळे लोक ते फॉलो देखील करतात .फालोअर्स वाढल्याने कंपनीची ओळख देखील वाढते. आपल्याला देखील आपल्या कंपनीला पुढे वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा लागणार. या साठी आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवश्यक आहे. पोस्ट शेयर किंवा सामायिक करताना वेळ आणि टॅग कडे लक्ष द्या. जेवढे जास्त लोक आपल्या पोस्टला लाईक,कॉमेंट आणि रिपोस्ट करतील आपल्या कंपनीला तेवढाच फायदा ,मिळेल.
* आप्तेष्ट आणि कुटुंबीयांची मदत घ्या-आपल्या कंपनीला पुढे वाढविण्यासाठी आपल्या कुटुंबीयांची आणि मित्रांची मदत घ्या. त्यांना
खरेदी पर्याय देखील बनवा. त्यांचे अनुभव सामायिक करायला सांगा .आणि तशी रिपोर्ट देखील आपण बनवा .जेणे करून आपले व्यवसाय वाढेल.
* न्यूज लेटर पर्याय-न्यूजलेटर आपल्यासाठी मदतगार होऊ शकतो. या मध्ये कन्टेन्ट,ब्लॉग,कुपन,किंवा सेलचे अपडेट्स सामायिक केले जाऊ शकते. हे साधन सोशल मीडियावर दिसत नाही. या मुळे आपल्याला व्यवसायातील काही कमी असतील तर हे कळतील.