Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे क्षण तुम्ही हरवले तर नाही नं ?

हे क्षण तुम्ही हरवले तर नाही नं ?
परिवारांसोबत सत्तीलावणी, गाण्याच्या भेंड्या, अष्टचंगपै.
छोट्याश्या शेकोटीसोबत रंगलेल्या गप्पा.
पारिवारिक फोटो एकत्र बसून पाहण्याचा आणि त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा आनंद.
आईच्या हाताची गरमा गरम पोळी आणि त्यावर साजुक तूप.
घरचा डबा घेऊन बगीच्यात जाण्याचा आणि झाडांवर बांधलेल्या झुल्यावर झुलण्याचा आनंद.
सायंकाळची शुभंकरोती.
वयोवृद्ध वडील माणसांसोबत त्यांच्या जीवनाचे कडू गोड क्षण.
टपरीवरचा चहा.
उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाणे.
देशी मेवा आवळा, चिंचा, कवठ, बोर, ऊस खाण्याचा आनंद.
मित्रांसोबत पतंग उडविणे व त्याच्या काटण्याचा आनंद आणि इंदोरी भाषेत काटी हैचा आनंद. 
 
आजच्या ह्या धावपळीच्या युगात असे किती तरी विना मूल्य तरीपण अमूल्य असलेले क्षण आज ही आठवले तरी ही ओठांवर हसू अन मनात समाघान देतात. आपण एकदा तरी आपल्या भूतकाळाची आठवण करून हा वारसा आपल्या भावी पिठीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तांब्याच्या भांड्यात चुकूनही ह्या वस्तू ठेवू नये