Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:27 IST)
हसत खेळत कुटुंब म्हटलं की पोर बाळांनी भरलेलं घर असे चित्र समोर येतं. अनेक जोडपे फॅमिली प्लानिंग करता परंतू अनेकदा काही महिलांना गर्भधारणा होण्यासाठी खूप समस्यांना सामोरा जावं लागतं. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे प्रजनन क्षमतेमधील कमजोरपणा वाढत आहे. अशात बाळाची स्वप्न बघत असणार्‍यांनी फर्टिलिटी चांगली राखला पाहिजे. त्यासाठी काही टिप्स आहे ज्या अमलात आणून आपले कार्य होऊ शकतं-
 
व्यसन सोडा
आजच्या काळात व्यसन ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली असून याचा प्रजनन क्षमतेवर खूप विपरित परिणाम दिसून येत आहे. यामुळे स्त्रीला गरोदर राहण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. शिवाय पुरुषाला व्यसन असल्यास प्रजनन क्षमता कमजोर पडू शकते. व्यसनांपासून शक्य तितके दूर राहा आणि प्लानिंग करा.
 
ताणवापासून दूर राहा
हल्लीच्या धावपळी आणि स्पर्धेच्या काळात कामाचं, घरचं ताण येणं साहजिकच आहे. परंतू अनेक गोष्टींमुळे ताण तणाव निर्माण होत असल्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर पडू शकतो. शक्य तितके आनंदी राहा ज्यामुळे फर्टिलिटी चांगली राहील.
 
नियमित व्यायाम
व्यायामाने शरीर सुदृढ राहतं. चांगल्या फर्टिलिटीसाठी फिट राहणे गरजेचे आहे म्हणून आवर्जून व्यायाम करा. लठ्ठपणामुळे फर्टिलिटी वर परिणाम होऊ शकतो. वेळात वेळ काढून व्यायाम करावा ज्याने शरीरही तंदुरुस्त राहील आणि मन देखील.
 
आहार
आपल्या आहारात जंक फूड आणि पॅक्ड फूड ऐवजी पोषक तत्वे असल्यास हार्मोन्स संतुलित राहतात आणि याचा परिणाम म्हणजे प्रजनन क्षमता वाढते. पुरूषांमध्ये निरोगी स्पर्म्स तसेच महिलांमध्ये एग्ज क्वालिटीमध्ये सुधार होतो. आपल्या आहारात योग्य भाज्या, डेअरी प्रॉडक्ट्स, फळ, आणि व्हिटॅमिन युक्त आहारांचा समावेश करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा