उंदीरासारखी दिसणारी चुचुंद्री सर्वांनीच बघितली असणार. हे तपकिरी, पांढऱ्या, काळ्या आणि मातीच्या रंगाची असते. हा फार धोकादायक प्राणी आहे. हा उंदीर आणि सापाला खाऊ शकतो. घुबडाचा याला खातो. चला जाणून घेऊया याचा घरात असण्याचे फायदे आणि तोटे.
घरात असण्याचे फायदे -
1 असे म्हणतात की ज्या माणसाच्या भोवती हा प्राणी फिरेल समजावं की नजीकच्या भविष्यात त्याला एखादा मोठा फायदा होणार आहे.
2 त्याच प्रमाणे चुचुंद्री जर का त्या घराच्या भोवती फिरत असल्यास त्या घरावर येणार संकट टळत.
3 असे मानले जाते की जी व्यक्ती दिवाळीच्या रात्री चुचुंद्री बघते त्याचे नशीब उघडते. हे दिसण्याचा अर्थ आहे की आपण फारच भाग्यवान आहात आणि आपल्या धनाशी निगडित सर्व अडचणी संपणार आहेत.
4 ज्या घरात चुचुंद्री फिरते तेथे लक्ष्मी येते. तथापि, ज्या घरात स्वच्छता अधिक होते तिथे चुचुंद्री येण्याची शक्यता कमी असते.
5 जिथे चुचुंद्री असते तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्राणी येत नाही.
6 जिथे चुचुंद्री असते तिथे जिवाणू नसतात कारण ही चुचुंद्री न दिसणाऱ्या जिवाणूंना देखील खाऊन टाकते.
घरात येण्याचे तोटे -
1 चिचुंद्रीच्या थुंकीत काळ्या नागाच्या विषयासारखं विष आढळतं. असे म्हणतात की चुचुंद्री जर आपल्या शरीराच्या ज्या भागावर थुंकून देते तर समजावं शरीराचा तो भाग सुन्न पडतो. टाळूच्या केसांवर थुंकल्यास टाळूचे तेवढ्या भागाचे केस गळून पडतात. म्हणून हे घरात असणं धोकादायक आहे. झोपताना याची काळजी घ्यावी लागते.
2 जर आपल्या घरात देखील चुचुंद्री आहे तर घराच्या अन्नाला संसर्ग होण्यापासून वाचवा, कारण याचे थुंक विषारी असतं. हे अन्न संक्रमित करत जे आपल्या आरोग्यास मोठ्या प्रमाणे नुकसान करू शकतं.
3 चुचुंद्री लहान मुलांना चावली तर तिचे विष शरीरात पसरू शकतं. असे म्हणतात की चुचुंद्री ज्या प्राण्याला चावते किंवा आपल्या शिकाऱ्याला चावल्यावर त्याचे दात लागतातच प्राण्याला काहीही सुचत नाही. मेंदूत भुरळ पडते, श्वास घेणं त्रासदायक होतं. आणि त्याला अर्धांगवायू होतं.
4 रात्री आपल्या मुलांच्या पायाला चुचुंद्री कुरतडून टाकल्यावर आपल्याला कळणार देखील नाही त्याचे कारण असे की चुचुंद्री आपल्या थुंकीने ती जागा सुन्न करते.
5 चुचुंद्री चावल्या वर 'अँटी रेबीज इंजेक्शन' लावावे लागतात. कुत्रा, मांजर, वटवाघूळ, उंदीर, चुचुंद्री, मुंगूस, कोल्हा, वाघ, सिंह आणि इतर सस्तन प्राणी चावल्यावर दुर्लक्षित केल्यामुळे रेबीज होण्याचा धोका वाढतो. यामुळे हायड्रोफोबिया नावाचा आजार होतो. या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो म्हणून आपण चुचुंद्रीला सहज घेऊ नका, हा एक धोकादायक जीव आहे.
चुचुंद्री घालवण्याचे 3 उपाय -
1 चुचुंद्री घालविण्यासाठी घराच्या काना कोपऱ्यात कापसात पिपरमेन्ट ठेवून द्या.
2 पुदिन्याचे पान किंवा फुलाला वाटून घ्या आणि हे चुचुन्दरीच्या बिळाजवळ किंवा येण्या जाण्याच्या मार्गावर ठेवा.
3 लाल मिरचीची पूड चुचुंद्री येण्या जाण्याच्या ठिकाण्यावर ठेवा.