माश्यांचा त्रास
पाणी भरलेल्या भांड्यात पुदिनाच्या काही काड्या टाकून ठेवण्यास माश्यांचा त्रास कमी होतो.
टॉवेल
टॉवेल नरम राहावे यासाठी पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात टॉवेल भिजत घालावे व नेहमीप्रमाणे धुवावे.
भांडण्याचा करपटपणा
डाळ, भाजी, दूध वगैरे पदार्थ गरम करताना करपून भांड्याच्या तळाशी करपट राप राहतो. तो सहजपणे निघत नसल्यास भांड्यात पाणी घालून त्यात दोन ते तीन चमचे व्हिनेगर घाला. एक उकळी घेऊन नंतर भांडे घासल्यास स्वच्छ निघतात.
फ्लॉवर पॉट
फ्लॉवर पॉटमधील फुले टवटवीत राहण्यासाठी त्यात ताजे पाणी घालून पाण्यात चमचाभर साखर किंवा मीठ घालावे.