Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठेवायचं की फेकायचं?

ठेवायचं की फेकायचं?
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (12:59 IST)
कॉलेज सुरू व्हायला अजून थोडा वेड आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा माळ्यावर गेलेली कॉलेजची सॅक, कॉलेजला जायचे कपडे याची जमवाजमव करावी लागणार आहे. अर्थात कॉलेजच्या सुरूवातीला अभ्यासापेक्षा आपलं लक्ष असतं फॅशनकडे. त्यामुडे आम्ही त्याबद्दलच काही टिप्स देतोय.
 
डेनिम्सचं काय करायचं? फेडेड डेनिम्स गेल्यावर्षी इन असतीलही पण यंदा मात्र त्या फॅशनमध्ये नाहीत. त्यामुळे तुमच्या अशा डेनिम्स कपाटातच राहू द्या. बेसिक ब्ल्यू यंदाचा इन कलर असेल.
 
स्कार्फ आणि स्टोल्स - गेल्या वर्षी ज्या मुर्लीनी अनेक स्कार्फस आणि स्टोल्स जमा केले असतील, त्यांना मात्र काळजीचं कारण नाही. कारण ही अशी फॅशन आहे, ती कधीच आऊटडेटेड होत नाही. फंकी निऑन कलरचे, ब्राइट आणि प्रिंटेड स्कार्फस यंदाही इन आहेत.
 
रंगीत फ्रेम्स - हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या अशा रंगाच्या फ्रेम्सनी गेल्यावर्षी तुमचे सजले असतील. पण यंदा मात्र नाही.
 
कलर्ड पँट्‍स - निळ्या, लाल, हॉट पिंक, हिरव्या रंगाच्या पँट्स गेल्यावर्षी इन होत्या. यंदाही त्याची फॅशन असेलच. या कलर्ड पँट्ससोबत सोम्य रंगाचे शर्टस घालून तुम्ही त्याचा लूक आणखी सुंदर करू शकता. क्लासिक स्टाइलचे अॅव्हिएटर्स, वेफेरर्स आणि साध्या गोल फ्रेम्स कायमच इन असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE Main नावाने बोगस वेबसाइट सुरू, NTA चा सावध राहण्याचा इशारा