Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Monsoon Hacks:पावसाळ्यात कपड्यांमधून येणारी दुर्गंध दूर करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Monsoon Hacks:पावसाळ्यात कपड्यांमधून येणारी दुर्गंध दूर करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
, मंगळवार, 12 जुलै 2022 (22:18 IST)
Monsoon Hacks: पावसाळ्यात घरातील महिलांना कपडे धुणे आणि वाळवणे याचा सर्वात जास्त त्रास होतो.अशा परिस्थितीत मशीनमध्ये जास्त वेळ कपडे पडून राहिल्यास त्यांना दुर्गंधी येऊ लागते.दुर्गंधीयुक्त कपडे परिधान केल्याने त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो.तुमच्यासोबतही अशीच समस्या येत असेल तर कपड्यांमधून येणारा वास दूर करण्यासाठी या टिप्स वापरून पहा. 
 
पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय-
 
* व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा -
अनेक वेळा डिटर्जंटने कपडे धुतल्यानंतरही त्यांमधून दुर्गन्ध जात नाही.अशावेळी कपडे धुण्यासाठी डिटर्जंटमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा.असे केल्याने  कपड्यांमधून येणारा दुर्गन्ध निघून जाईल.
 
* लिंबाचा रस हा देखील एक प्रभावी उपाय आहे-
पावसाळ्यात ओलावा असल्याने ओल्या कपड्यांमधून दुर्गंधी येऊ लागते.अशा परिस्थितीत कपडे धुताना लिंबाचा रस वापरल्यास कपड्यांना वास येत नाही.
 
*कॉफीचा वास निघून जाईल-
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते.यावर उपाय करण्यासाठी कॉफी कपात घेऊन कपाटात ठेवा.असे केल्याने कपड्यांमधला वास लवकरच निघून जाईल.
 
* कपडे पसरवून टाका -
पावसाळ्याच्या दिवसात साठवलेल्या ओल्या कपड्यांमधून लवकरच दुर्गंधी येऊ लागते.अशा स्थितीत शेडमधील दोरीवर तुमचे कपडे वेगळे पसरवा, वातावरणात आर्द्रता असली तरी तुमच्या कपड्यांना दुर्गन्धी येणार नाही.
 
* पावसाळ्यात कपडे सुकत नसल्यास पंखेच्या हवेमध्ये सुकवा
 
* पावसाळ्यात कपडे धुण्याचा साबण जरा अधिक प्रमाणात करावा. सोबतच जंतुनाशक द्रव देखील वापरु शकता ज्याने कपड्यातून दुर्गंधी घालवण्यास मदत होईल. तरी कपडे ओलसर जाणवत असतील तर आपण त्यावर प्रेस देखील करु शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

How to become Sub Inspector: उपनिरीक्षकसाठी, अभ्यासक्रम , पात्रता, पगार वयोमर्यादा, जाणून घ्या