पावसाळा जिथे निसर्गाच सौंदर्य दाखवतं, तसेच पावसाळ्यात घरात कीटकांचा प्रवेश होण्यास सुरुवात होते. कीटक जसे की मुंग्या, झुरळ, माशी, पाल इत्यादी आणि हे सर्व आजारांना कारणीभूत असतात. घरात कीटक होण्याचे मुख्य कारण म्हणजे घराची चांगल्या प्रकारे स्वच्छता न होणे. अश्या परिस्थितीत कीटक अनेक आजारांना आमंत्रण देतात.
खेरीस पावसाळ्यात घराला कीटकांपासून कसं काय दूर ठेवलं जाऊ शकतं, जाणून घेऊ या काही खास टिप्स.
* सर्वप्रथम घराची व्यवस्थितरीत्या स्वच्छता करा. असं आपण दररोज केल्याने, कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होईल.
* घरात माशी आणि मुंग्या न होण्यासाठी दररोज लादीवर फिनाईल आणि तुरटीचं पावडर मिसळून नियमितपणाने पुसल्याने हळू-हळू हे नाहीसे होतात.
* आपण ऐकले असणारच की घरात मोरपीस लावल्याने कीटकांचं येणं कमी होत. हे अगदी खरं आहे. आपल्याला या कीटकांपासून सुटका हवा असल्यास घरात मोरपीस लावा. आपण ते घराच्या आत आणि मुख्य प्रवेश दारावर लावावं.
* जर आपण घरात पालीपासून त्रस्त झाला असल्यास तर अंडींच्या सालींना भितींमध्ये अडकवून ठेवावं. अश्या पद्धतीने हे ठेवा की ते पडणार नाही. याला भिंतीला चिटकवून द्या. काहीच वेळात घरातील पाली नाहीश्या होतात.
* स्वयंपाकघरातील माश्या-डास काढण्यासाठी 1 चमचा कॉफी पावडरला तव्यावर जाळून धूर देणे. जेवणाच्या टेबलावरून माश्या काढण्यासाठी टेबलाच्या मध्यभागी पुदिन्याच्या पानांचे ताजे गुच्छ ठेवा.
* घराच्या मध्यभागी कापराचा धूर द्यावा. यामुळे घरात त्याचा वास तर राहीलच, तसेच माशी- डास देखील कमी होतील.
* कीटकांना काढून टाकण्यासाठी काही योग्य वनस्पती आहेत, जसे की तुळस, पुदिना आणि ओवा याची घरात आवर्जून लागवणं करा. हे लावल्याने घरात कीटक होणार नाही.