Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यायामापूर्वी त्वचेची काळजी अशी घ्या

व्यायामापूर्वी त्वचेची काळजी अशी घ्या
, मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (16:49 IST)
आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम करतो. पण त्या मध्ये आपल्या त्वचेची काळजी घेतली जात नाही. अशी बरीच कमी लोकं असतात, जी वर्क आउट्सच्या पूर्वी आपल्या त्वचेची योग्यरित्या काळजी घेतात. असं करणं फार महत्त्वाचे असत. कारण वर्क आउट्सच्या दरम्यान भरपूर घाम येतो आणि जर आपली त्वचा स्वच्छ नसेल तर घाणेरड्या त्वचेवर घामामुळे बेक्टेरिया अधिक वाढू शकतात. या शिवाय व्यायामाच्या दरम्यान आपल्या त्वचे चे निर्जलीकरण होते. चला तर मग आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की व्यायामापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी.

त्वचेची काळजी घेणारे तज्ज्ञ म्हणतात की जेव्हा आपण  वर्क आउट साठी जात असाल तेव्हा मेकअप पासून शक्य असेल तेवढे वाचावे. हे आपल्या छिद्र आणि घामाच्या ग्रंथींना अवरोधित करतात, या मुळे आपल्या त्वचेला श्वास घ्यायला अडचण होते. म्हणून आपण वर्क आउट करायला जाण्याच्या पूर्वी आपल्या त्वचेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. या साठी आपण एखाद्या फेसवॉश ने चेहरा स्वच्छ करणे अधिक चांगले राहील.
 
* मॉइश्चराइजिंग करणे आवश्यक -
त्वचेची काळजी घेणारे तज्ज्ञ म्हणतात की त्वचा स्वच्छ केल्यावर त्याला मॉइश्चराइझ करणे देखील आवश्यक आहे. वास्तविक वर्क आउट्स दरम्यान आपल्या त्वचे मधून भरपूर घाम येतो, जे आपल्या त्वचेचे निर्जलीकरण करतो. अशा परिस्थितीत त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉईश्चराइझ करणं आवश्यक असत. म्हणून जेव्हा आपण आपला चेहरा स्वच्छ कराल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावा, कारण वर्क आउट केल्यावर आपले ओठ कोरडे होतात आणि सोलवटले जातात. 
 
* एसपीएफ संरक्षणाला दुर्लक्षित करू नका - 
त्वचेची काळजी घेणारे तज्ज्ञ म्हणतात की प्री- वर्क आउट त्वचेची काळजी घेताना सूर्यच्या किरणां पासून संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. जर आपण वर्क आउट दरम्यान मैदानी व्यायाम करण्याची योजना आखत असाल तर, जसे की बागेत जाऊन धावणे  किंवा बाहेरच योगा करीत असाल तर बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे विसरू नका.
 
* अँटिपर्सीपरंट लावा -
हे खरे आहे की आपल्याला व्यायामशाळेत किंवा वर्क आउट्स करताना खूप घाम गाळावा लागतो. तर आपल्या बगलेला अँटिपर्सीपरंट रोलऑन करून बेक्टेरिया आणि जंताचे घर होण्यापासून संरक्षण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या लहान -लहान चुका करतात आपल्या नॉन-स्टिक भांडींना खराब