Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या मुलांना या चांगल्या सवयी शिकवा प्रत्येक जण प्रशंसा करेल

आपल्या मुलांना या चांगल्या सवयी शिकवा प्रत्येक जण प्रशंसा करेल
, गुरूवार, 11 मार्च 2021 (20:20 IST)
असं म्हणतात की मुलें हे देवाच रूप असतात. ते आपल्या सभोवताली पासून बरेच काही शिकतात. म्हणून त्यांना लहान पणा पासून त्यांना नेहमी चांगल्या सवयी लावाव्यात. जेणे करून त्या सवयी त्यांना आयुष्यात कामी येतील. आम्ही अशाच काही सवयीं बद्दल सांगत आहोत.ज्या मुळे ते चांगले माणूस बनतील आणि लोक त्यांची प्रशंसा करतील. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* लहान -मोठ्यांचा आदर करा-
मुलांना आवर्जून हे शिकवा की आपल्या पेक्षा मोठे असलेले लोक -भाऊ,बहीण,नातेवाईक इत्यादींचा आदर करा.तसेच त्यांनी  पण मुलांशी बोलताना सौजन्याने बोलावे. तसेच मुलांपेक्षा लहान असणाऱ्यांना देखील सांगावे की आपण देखील त्यांचा आदर करावा.  
 
* नेहमी मुलींचा आदर करा- 
सध्या वाचतो की मुलींशी चांगली वागणूक होतं नाही. आपण आपल्या मुलाला हे शिकवा की काही ही झाले तरी नेहमी मुलींचा आदर करावा. गरज पडल्यास त्यांना मदत करा. त्यांना वाईट बोलू नका आणि वाईट वागू नका. तसेच त्यांच्या कडे वाईट दृष्टीने बघू नका. 
 
* संयम बाळगा- 
सध्याच्या काळात बघण्यात येते  की मुलं क्षणातच रागाच्या भरात येऊन काहीही करतात. यासाठी आपण मुलाला शिकवा काहीही झाले तरी आपल्याला संयम आणि धैर्य राखणे आवश्यक आहे. संयम गमावू नये.संयमाने सर्व कामे व्यवस्थित होतात.  
 
* सामायिक करणे शिकवा- 
मुलांना नेहमी कोणतीही गोष्ट सामायिक करायला शिकवावे. वस्तूंना सामायिक केल्याने आपसातील प्रेम वाढते. वस्तूंना सामायिक करणे ही चांगले माणूस असल्याचे दर्शवते.घरात असो किंवा बाहेर असो वस्तूंना सामायिक केल्याने नातं देखील दृढ होतात.मग ते नातं भाऊ-बहिणीचे असो, मित्राचे असो किंवा इतर कोणी असो. घरात असो, सहलीला असो,शिकवणी च्या ठिकाणी असो, शाळेत असो,वस्तूंना सामायिक करावे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काकी योग मुद्रा करण्याचे फायदे जाणून घ्या