Menopause ही महिलांच्या जीवनातील एक अशी स्थिती आहे जेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांचा थेट परिणाम महिलांच्या सौंदर्यावर दिसून येतो.
हार्मोनल असंतुलन वाईटरित्या मानसिक आरोग्य बिघडवते ज्यामुळे मन अस्वस्थ आणि दुःखी राहतं. त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव महिलांना त्रास देतो याच कारणामुळे रजोनिवृत्ती त्यांच्यासाठी अधिक वेदनादायक होते.
सोबतच थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, डोके जड होणे आदी समस्यांचाही सामना करावा लागतो. ही लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असू शकतात. रजोनिवृत्तीची स्थिती वयाच्या 45 नंतर आणि 55 वर्षांच्या दरम्यान येते. यावेळी बहुतेक स्त्रिया स्वतःला भावनिकदृष्ट्या कमजोर होतात तेव्हा त्यांना अधिक प्रेमाची गरज असते.
अशा प्रकारे काळजी घ्या
रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना त्वचेतील कोरडेपणा, सुरकुत्या, निस्तेजपणा, सैलपणा यासारख्या अनेक समस्या सुरू होतात. यासाठी काही टिप्स -
आपल्याला आपल्या आहाराकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे कारण आहार योग्य असेल तर शारीरिक आणि मानसिक समस्या तुम्हाला फार त्रास देत नाहीत.
तुम्ही दररोज सुके मेवे खा. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दिवसातून दोनदा एक ग्लास दूध प्यावे. दूध पिणे शक्य नसेल तर एक मोठी वाटी दही नक्कीच खा.
हिरव्या भाज्या, दररोज किमान एक फळ आणि डाळी खा.
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावा.
आठवड्यातून 3 दिवस फेसपॅक लावा. आठवड्यातून दोनदा त्वचेवर मध लावा.
त्वचा स्क्रब करा. कारण त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकल्याने त्वचा तरूण आणि सुंदर दिसते.