सध्या कोरोनाच्या काळात बहुतेक लोकं ' वर्क फ्रॉम होम ' म्हणजे घरातूनच ऑफिसचे काम करीत आहेत. अश्या परिस्थितीत घरातील कामांना त्वरित आणि योग्यरीत्या करणे देखील आवश्यक आहे. कारण घरात असे काही कामे निघतात ज्यामध्ये बराच वेळ लागतो. अश्या परिस्थितीत इतर कामांवर देखील त्याचा परिणाम पडतो. अश्या परिस्थितीत काही युक्त्या करणे आवश्यक आहे ज्याचा मदतीने आपण थोडक्याच वेळात आपली लहान-सहन कामे करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काही टिप्स.
टोमॅटोची साले काढण्यास अधिक वेळ लागत असल्यास, आपण या वेळेला वाचवू शकता. आपण टोमॅटोची साले काढण्यासाठी त्यांना कोमट पाण्यात थोड्यावेळ भिजवून ठेवा. हवे असल्यास आपण उकळून घ्यावे. असे केल्याने टोमॅटोची साले सहजरीत्या निघतील आणि आपला वेळ पण वाया जाणार नाही.
कांदा- टोमॅटोच्या शिवाय भाज्या चविष्ट बनणे अवघड आहे, अश्या परिस्थितीत कांदा -टोमॅटो घाई घाईने चिरण्यात आपले हात कापले जाते. हा त्रास टाळण्यासाठी आपण काट्यात(fork)मध्ये त्यांना अडकवून चिरू शकता. या मुळे हे सहजरीत्या चिरले जातील आणि आपले हात देखील कापण्याची भीती राहणार नाही.
कांद्याची पात बहुतेक लोकांना आवडते आणि याची भाजी देखील चविष्ट लागते. अशामध्ये आपण त्वरित कापण्याऐवजी याला फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता आणि वेळेवर त्याचा वापर करू शकता.
मिक्सरच्या पॉट किंवा जार मध्ये डाग लागले असल्यास आणि हे डाग काढण्यासाठी आपले वेळ वाया जात असल्यास आपण एका भांड्यात गरम पाणी करून ते पॉट मध्ये ओतावे आणि डिशवॉश मिसळवून झाकण लावून एकदा फिरवून घ्या. असे केल्याने पॉट मधला चिकटपणा निघेल आणि हे चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल.