Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, टॉवेल बार बाथरूम शिवाय अनेक प्रकारे वापरता येतं

काय सांगता, टॉवेल बार बाथरूम शिवाय अनेक प्रकारे वापरता येतं
, मंगळवार, 5 जानेवारी 2021 (11:36 IST)
जेव्हा घरात टॉवेल बार वापरण्याची चर्चा होते तर ते स्नानगृहात लावले जाते. जेणे करून टॉवेल त्यावर लावले जाऊ शकतील. पण टॉवेल बारचे वापर या पुरतीच मर्यादित नाही. इच्छा असल्यास हे टॉवेल बार घरात सहजपणे बऱ्याच जागी वापरू शकता. एवढेच नव्हे तर टॉवेल बार च्या साहाय्याने जागेच्या समस्येवर देखील विजय मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या टॉवेल बारच्या वेगवेगळ्या प्रकारे वापर बद्दल.
 
* स्कार्फ ऑर्गनाईझर बनवा -
जर आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे स्कार्फ घालणे आवडते तर त्यांना ऑर्गनाईझ करणे अवघड काम आहे. अशा परिस्थितीत आपण टॉवेलच्या बारला घरात लावा. तसेच स्कार्फ रिंग्स मध्ये ठेवा. या नंतर आपल्यासाठी ओढणी आणि स्कार्फ ऑर्गनाईझ करणे चुटकीसरशी काम आहे.
 
* स्वयंपाकघरात वापरा- 
आपले स्वयंपाकघर लहान आहे आणि त्यामध्ये जागेची समस्या असेल तर तिथे साइड टॉवेल बार लावा. या मध्ये भांडी आणि पॅन सहजपणे लावू शकता. जेणेकरून आपल्याला स्वयंपाकघराचे भांडे ठेवणे सहज होईल आणि अशा प्रकारे भांडे ठेवल्याने स्वयंपाकघर देखील चांगले दिसेल. या शिवाय टॉवेल बार स्वयंपाकघरात लावून टॉवेल आणि कपडे लावू शकता.
 
* ज्वेलरी ऑर्गनाईझर बनवा- 
ऐकण्यात विचित्र वाटेल पण टॉवेल बार ज्वेलरी ऑर्गनाईझर सारखे वापरू शकता. या साठी भिंतीवर टॉवेल बार लावा आणि त्यामध्ये हुक लावून आपली ज्वेलरी लावा.
 
* मुलांच्या कामी येतील -
टॉवेल बार स्नानगृह किंवा स्वयंपाकघराच्या व्यतिरिक्त मुलांच्या खोलीत देखील वापरू शकता. या साठी हे मुलांच्या स्टडी डेस्क वर लावा. त्यावर लहान -लहान हँगिंग बास्केट लावून त्यामध्ये मुलांच्या स्टेशनरीला ऑर्गनाईझ करा. या मुळे मुलांची खोली चांगली दिसेल. तसेच मुलांचे लहान-मोठे सामान जसे की पेन,पेन्सिल आणि कलर्स इत्यादी ठेवणे सहज होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय सैन्यात 10 वी आणि 12 वी पास लोकांसाठी शिपाई जीडी आणि क्लार्कची भरती