Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कपडे खरेदी करताना....

कपडे खरेदी करताना....
बायका शॉपिंग करायला गेल्या की त्यांना काय घ्यावं आणि काय नाही सुचत नाही. कित्येकदा भावनेच्या वेगात वाहून त्या आपल्या बजेटच्या वरती शॉपिंग करतात. मात्र घरी आल्यावर असे वाटते की, यापेक्षा दुसरी चांगली वस्तू घेऊ शकलो असतो. म्हणूनच थोडीशी काळजी घेतली तर खरेदीचा मनासारखं आनंद मिळू शकेल.
 
* ब्रँडेड कपड्यांवर सेल चालू असली तरी घाई-घाईत अनफिट कपडे घेऊ नये. कित्येकदा ‍कपडे फिटिंगचे केले तरी त्यांचा शेप बिगडून जातो. म्हणून कपडे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नये.
 
* भडक रंगाचे कपडे फॅशनमध्ये असले आणि दुसर्‍यांवर ते शोभून दिसत असले तरी ते विकत घेताना याचा विचार करून घ्या की ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत की नाही. चकचकीत कपडे घेताना आर्कषक वाटत असले तरी ते तुमच्यावर कसे दिसतात ते महत्त्वाचे आहे.
पुढे वाचा..
webdunia
* वेस्टर्न कपडे पहिले कधी घातले नसतील तर ते खरेदी करण्या आधी घालून पाहा. ते तुम्हाला सूट होत असल्यास खरेदी करा.
 
एकाध पॅटर्न खूप आवडा तरी त्याचे पाच सहा पीस खरेदी करू नका. कारण फॅशन येते तशी फॅशन निघायलाही वेळ लागत नाही.
 
कोणताही ड्रेस किंवा टी शर्ट खरेदी करताना त्याची किंमत खरचं तेवढी आहे का याची पडताळ करून घ्या. दोन-तीन दुकान पाहिल्याशिवाय पहिल्याच दुकानातून कपडे खरेदी करण्याची घाई करू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय