घर बांधताना अनेक पर्याय समोर असतात. प्लॅनपासून फ्लोअरिंगपर्यंत उपलब्ध फ्लोअरिंग पर्यायातून बजेटमध्ये असणार्या पर्यायांची निवड केली जाते. घर सजावटीचे नवे ट्रेंड्स पाहणे गरजेचे आहे. कमी बजेटमध्ये देखील अत्यंत सुबकपणे आणि लेटेस्ट कन्स्पेटने घर सजवता येते. सध्या वुडन फ्लोअरिंगचा ट्रेंड जोरात आहे.
सुरुवातीला सिंबॉल मानले जायचे मात्र वूडन फ्लोअरिंगने हा ट्रेंड मोडीत काढला आणि घराला एक वेगळा लूक देऊ केला. टिकाऊ, दिमाखदार, मेन्टेनन्स फ्री तरीही स्टायलिश असे वुडन फर्निचर आजकाल बर्याच प्रमाणात वापरले जात आहे. घरातच नव्हे तर पब्लिक प्लेस, लॉबीज, ऑफिसेस, शोरुम्स, हॉटेल्स, क्लब्स अशा ठिकाणीदेखील वुडन फ्लोअरिंगचा आवर्जुन वापर होतो. भारतातील वातावरणाचा अभ्यास करता वुडन फ्लोरिंग हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.