Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कच्च्या तेलाच्या किमती 150 डॉलर्सवर जाणार?

कच्च्या तेलाच्या किमती 150 डॉलर्सवर जाणार?

वेबदुनिया

तेहराण , मंगळवार, 31 जानेवारी 2012 (16:29 IST)
अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांच्या संघाने इराणवर निर्बंध लादल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या तेलाचे दर आगामी काळात प्रति बॅरलला 120 ते 150 डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याबाबत नॅशनल इराणियन ऑईल कंपनीने माहिती देताना सांगितले की, युरोपीय संघाचे सदस्य असणार्‍या देशांमध्ये तेल निर्यातीसाठी इराणवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलपुरवठा करण्याऐवजी इराणमधील तेल कंपन्यांकडून स्थानिक बाजारपेठेतील तेलपुरवठ्यावर प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi