Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रीज डिमेट खाते: अली बाबाची गुहा

फ्रीज डिमेट खाते: अली बाबाची गुहा

भाषा

विविध कारणांसाठी फ्रीज करण्यात आलेल्या डिमेट खात्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. अर्थ राज्य मंत्री एस एस पलानीमनिक्कम यांनी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली.

आयकर विभागाने फ्रीज केलेल्या काही डिमेट खात्यांची चौकशी सुरू केली असून, यात कोट्यवधीची माया असल्याचे उघड झाल्याचे ते म्हणाले.

6385 डिमेट खाते फ्रीज करण्यात आले असून, त्यांचे बाजार मूल्य 2008मध्ये 6709.21 कोटी आणि त्यांचे शेअर मूल्य 16230 असल्याचे पलानीमनिक्कम यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi