Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PVR और INOX शेअर्स मध्ये विक्रमी वाढ,विलीनीकरणाची घोषणा

webdunia
मंगळवार, 29 मार्च 2022 (13:08 IST)
आजच्या व्यवसायात, PVR आणि INOX Leisure या मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर्समध्ये विक्रमी वाढ झाली आहे. दोन्ही समभागांनी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये त्यांच्या नवीन 1 वर्षाच्या उच्चांकाला स्पर्श केला. PVR चा स्टॉक आज 10 टक्क्यांच्या वाढीसह 2004 रुपयांवर पोहोचला, तर INOX Leisure 20 टक्क्यांनी वाढून 564 रुपयांवर पोहोचला. 
 
प्रत्यक्षात दोन्ही कंपन्यांनी आपापसात विलीनीकरणाची घोषणा केली आहे. जेव्हा नवीन स्क्रीन लॉन्च होईल, तेव्हा त्याचे नाव PVR INOX असेल. यामुळे दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय मजबूत होईल, असा विश्वास आहे. ब्रोकरेज हाऊस या समभागांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा करत आहेत, ज्यातून ते गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.ब्रोकरेज हाऊस ने INOX-PVR विलीनीकरणाला सकारात्मक पाऊल म्हणून संबोधले आहे आणि दोन्ही समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या विलीनीकरणास 6 महिने लागू शकतात, जरी ते मंजुरीचा विषय आहे. विलीनीकरणानंतर कंपनीचा व्यवसाय अधिक मजबूत होईल. OTT धोका कमी करेल. भारतातील मल्टिप्लेक्सच्या तुलनेत OTT प्लॅटफॉर्मसाठी धोका कमी आहे.
 
मल्टिप्लेक्स उद्योगातील मोठी बातमी म्हणजे PVR आणि INOX चे विलीनीकरण होणार आहे. हा करार शेअर स्वॅपद्वारे पूर्ण केला जाईल. INOX च्या 10 ऐवजी  PVR चे 3 शेअर्स मिळतील. नवीन कंपनीचे नाव PVR INOX असेल. विलीनीकरणानंतर, PVR आणि INOX हे दोन्ही प्रोमोटर असतील. PVR 10.62 टक्के आणि INOX 16.66 टक्के असेल. विलीनीकरणानंतर, PVR आणि INOX या दोन्ही मंडळांमध्ये 2-2 जागा असतील. या विलीनीकरणानंतर दोन्हीकडे देशभरात 1500 हून अधिक स्क्रीन असतील. सध्या स्क्रीनची नावे त्यांच्या जुन्या नावांसोबतच राहतील. जेव्हा नवीन स्क्रीन लॉन्च होईल, तेव्हा त्याचे नाव PVR INOX असेल.
 
विलीनीकरणाच्या निर्णया नंतर दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, OTT प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.परंतु विलीनीकरणानंतर आम्ही टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही आम्ही प्रेक्षकांना आगामी काळात अधिक चांगला अनुभव देऊ शकू
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp वर ट्रांसफर होऊ शकेल 2GB हून मोठी फाइल