Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एलआयसीने प्रीमियम जमा करण्यात खाजगी कंपन्यांना टाकले मागे

एलआयसीने प्रीमियम जमा करण्यात खाजगी कंपन्यांना टाकले मागे

वेबदुनिया

WD
सरकारी विमा कंपनी एलआयसीने डिसेंबर २0१३ मध्ये समाप्त झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांदरम्यान प्रीमियम जमा करण्याच्या बाबतीत खाजगी कंपन्यांना मागे टाकले असून ३२ टक्के वाढ नोंदवली आहे.

खाजगी क्षेत्रातील २३ कंपन्यांच्या प्रीमियम संग्रहाची वाढ पहिल्यासारखीच राहिली; परंतु रिलायन्स लाईफ, मॅक्स लाईफ आणि मेटलाईफने याच दरम्यान नवीन विमा प्रीमियममध्ये वाढ नोंदवली. खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांनी २0१३-१४च्या पहिल्या ९ महिन्यांदरम्यान १८,९९१.२७ कोटी रुपये जमवले, तर मागील वर्षी याच कालावधीमध्ये १८,९0७.0७ कोटी रुपये जमा केले होते. एलआयसीने डिसेंबरमध्ये समाप्त झालेल्या ९ महिन्यांदरम्यान प्रीमियम संग्रह ३२ टक्केने वाढवून ६५,७७५ कोटी रुपये केला आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये एलआयसीचा ५0,२७७.४२ कोटी रुपये प्रीमियम जमा झाला होता.

दरम्यान, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ, बिर्ला सन लाईफ आणि एसबीआय लाईफसह खाजगी क्षेत्रातील अनेक मोठय़ा कंपन्यांचा प्रीमियम संग्रहामध्ये एप्रिल ते डिसेंबरदरम्यान घट झाली आहे. मात्र खाजगी क्षेत्रातील मोठी कंपनी रिलायन्स लाईफचे प्रदर्शन चांगले राहिले. या अवधीमध्ये प्रीमियम संग्रह ५६ टक्क्यांनी वाढून १,४२४.१३ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही रक्कम ९११.७५ कोटी रुपये होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi