गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड कंपनी अर्थात जीएसपीएलचा नफा चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 287.77 टक्क्यांनी वाढत 110.05 कोटीवर गेला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील याच कालावधीत कंपनीला 28.38 कोटीचा नफा झाला होता. चालू वर्षात कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली असून, 107.14 टक्क्यांनी उत्पन्न वाढल्याने ते 260.63 कोटीवर गेले आहे.