Article Marathi Share Market News %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ae 109112300058_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाजारात तेजी कायम

बाजारात तेजी कायम
एशियन आणि युरोपियन बाजारात चांगली वाढ दिसून आल्यानंतर आज भारतीय बाजारही तेजीत बंद झाले. मागील आठवड्यातील तेजी या आठवड्यातील पहिल्या दिवशी बाजाराने कायम राखली आहे. आज बीएसई 130 अंशांनी तर निफ्टी 44 अंशांनी वधारत बंद झाला.

बाजार उघडल्यानंतरच बाजारात तेजी दिसून येत होती. बीएसईचा निर्देशांक 130 अंशांनी वधारत 17152 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 44 अंशांनी वधारत 5096 अंशांवर बंद झाला.

सकाळी बाजारात
आशियाई बाजारात चांगली सुरुवात झाल्यानंतर आता भारतीय बाजारातही याच मार्गावर जात आहेत. सकाळी 11 वाजता निफ्टीने 34.20 अंशांची बढत घेत 5086.65 अंशांपर्यंत मजल मारली तर बीएसईचा निर्देशांक 104.11 अंशांनी वधारत 17127.33 अंशांवर आला आहे.

बाजाराचा आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. यापूर्वी मागील आठवड्यातही बाजार वधारलेलाच राहिल्याने चालू आठवड्यातही बाजारात चांगली वाढ दिसून येईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता.

आज बाजार सुरू झाल्यानंतर दोनही निर्देशांकात तेजी दिसून येत असून, निफ्टी वेगाने वधारत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi