दिवसभर सापशिडीचा खेळ खेळलेल्या मुंबई शेअर बाजारात आज पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 166.93 अंशांनी घसरत 16,719.50 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 50.25 अंशांनी घसरत 4,969.95 अंशांवर बंद झाला.
बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात एक टक्क्यांपेक्षा जास्त पडझड झाली.
बाजारात एचडीएफसी बँक, स्टरलाइट, ओएनजीसी, सन फार्मा, आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर जेपी असोसिएटस, भारती एअरटेल, आरकॉम, महिंद्रा, आरइंफ्रा, हिंडाल्को, एलएंण्डटी शेअर्समध्ये पडझड झाली होती.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा