आशियाई बाजारात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय बाजारात मोठी वाढ दिसून आली. सुरुवातीपासूनच उसळलेले बाजार बंद होताना बीएसई 387.92 अंशांवर तर निफ्टी 114.00 अंशांवर बंद झाले.
सुरुवातीपासूनच बाजारात वाढ दिसून येत होती. पहिल्या काही मिनिटांमध्येच बाजार दणक्यात वधारल्याने 15500 अंशांवर गेला होता.
बाजार बंद झाला तेव्हा बीएसई 15,628.75 तर निफ्टी 4,624.80 अंशांनी वाढत बंद झाला.
ओएनजीसी वगळता बाजारातील इतर शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. वधारलेल्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स, जेपी असोसिएटस, आयटीसी, एल एंण्ड टी, आणि हिंडाल्को या कंपन्यांचा समावेश होता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा