Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%98%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a3 109120700055_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण
मुंबई शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच घसरण दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 118 अंशांनी घसरत 16,983 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 42 अंशांनी घसरत 5,067 अंशांनी घसरत बंद झाला. मेटल आणि रियल्टी, गॅस, ऑइल या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

बाजाराच्या सुरुवातीला उत्साह दिसून येत असतानाच दुसऱ्या आणि अखेरच्या सत्रात मात्र बाजारात मोठी घसरण झाली. युरोपीय बाजारातील निगेटिव्ह सुरुवात भारतीय बाजाराच्या पडझडीला कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी प्रॉफिट बुकिंगच्या नादात बाजार घसरत बंद झाले होते. ऑटो, बँकिंग, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेली पडझड याला कारण ठरली होती. निफ्टी 23 अंशांनी घसरत 5,109 अंशांवर तर बीएसईचा निर्देशांक 84 अंशांनी घसरत 17,102 अंशांवर बंद झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi