मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीपासूनच तेजी दिसून येत आहे. सकाळी निर्देशांकात 174 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 59 अंशांनी वाढत 4900 अंशांवर गेला आहे. बाजारातील पहिल्या टॉप कंपन्यांमध्ये स्टरलाईट, टाटा स्टील, आणि जेपी असोसिएट यांचा समावेश आहे.
मंगळवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. यानंतर आज बाजार उघडताचक्षणी यात वाढ झाली.आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरलेल्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी 240 अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही 83 अंशांची वाढ झाली होती.
रियल्टी, बँकिंग, ऑटो, धातू या क्षेत्रातील शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली.निर्देशांक सुरुवातीला 16255.42 अंशांवर स्थिरावला होता. बाजार बंद होताना निर्देशांक 240.26 अंशांनी वाढत 16454.45 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टीही मंगळवारी 4808.35 अंशांवर स्थिरावत 83.50 अंशांनी वाढत 4892.10 अंशांवर बंद झाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा