मुंबई शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 159.91 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 47 अंशांनी वधारत बंद झाला. बाजार बंद झाला तेव्हा बीएसई 16,852.91 अंशांवर तर निफ्टी 5006.85 अंशांवर होता.
बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.41 टक्क्यांवर तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांनी वधारत बंद झाला.
सन फार्मा, सिप्ला, टीसीएस, ओएनजीसी, आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. बीपीसीएल, रॅनबॅक्सी, जिंदल स्टील, युनिटेक, आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा