Publish Date: Tue, 08 Dec 2009 (16:22 IST)
Updated Date: Tue, 08 Dec 2009 (16:22 IST)
सुरुवातीला फ्लॅट सुरू झालेल्या मुंबई शेअर बाजाराला दुसऱ्या सत्रात सुखद धक्का बसला. या आठवड्याच्या सुरुवातीला बाजारात घसरण झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी बाजार वधारत बंद झाले. बीएसईचा निर्देशांक 244 अंशांनी वधारत 17227 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 82 अंशांनी वधारत 5149 अंशांवर बंद झाला.
रियल्टी, मेटल, आणि ऑइल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून आली. निफ्टीमध्ये यूनिटेक, भारती एअरटेल, डीएलएफ, अंभुजा सिमेंटस, आणि जिंदल स्टील या कंपन्यांचे शेअर्स दणक्यात वधारले. दुसरीकडे सीप्ला, एसबीआय, मारुती सुझुकी, रॅनबॅक्सी, आणि हिरो होंडाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा