भारतात सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने सोन्याची किंमत आजवरच्या रेकॉर्ड पातळीवर पोचली आहे. जागतिक बाजारात गुंतवणुकीच्या प्रयत्नांमुळे सोन्याची किंमत 1,000 डॉलर प्रती औंस वाढली आहे.
अमेरिकन बाजारात सोन्याच्या किंमतींचा प्रभाव आशियायी क्षेत्रावरही पडतो. दिल्लीत सोन्याचा आजचा भाव आजवरचा सर्वांत वरच्या पातळीवर नोंदविण्यात आला असून तो 16,000 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.