Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रबोधक आयोजित नाट्य लेखन कार्यशाळा

प्रबोधक आयोजित नाट्य लेखन कार्यशाळा
मुंबई , बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (14:45 IST)
प्रबोधक युथ फेडरेशन या संस्थेतर्फे २२ ते २५ डिसेंबर रोजी चार दिवसीय नाट्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक होतकरु तरुण लेखन क्षेत्राकडे वळत आहेत. तरुणांकडे नवीन कल्पना आहेत. पण त्या कल्पनांना मूर्त स्वरुप प्राप्त करुन देण्याची आणि नाट्य लेखनाचे तंत्र समजवून सांगण्याची गरज आहे. याच हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे आयोजकांनी सांगितले आहे. या विषयावर ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक व नाट्य परिक्षक संभाजी सावंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
 
नाट्यबीज धारणेपासून अविष्कार निश्चितीपर्यंत मानसप्रक्रीया व त्यानंतर प्रसंग रचना, पात्रनिर्मिती आणि संवादलेखन ह्या बाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाईल, असे संभाजी सावंत यांनी या विषयावर बोलताना सांगितले आहे. अत्यंत माफक शुल्क असलेल्या ह्या कार्यशाळेचा अधिकाधिक लेखकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रबोधकतर्फे करण्यात आले आहे.
 
कार्यशाळेची माहिती :
(फक्त १५ जणांसाठी मर्यादित)
दिनांक: २२ ते २५ डिसेंबर
वेळ: सायं ५ ते रात्री ९
स्थळ: सोरेस बिल्डिंग, ठाकूर कम्पाऊंडच्या शेजारी, नटवर नगर, रोड क्रं ५ च्या समोर, जोगेश्वरी पूर्व. मुंबई.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9967796254/9833978384

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमाची भावना जागृत करा...