Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पश्चाताप

पश्चाताप
रात्री दोन वाजेच्या सुमारास लक्ष्मीताईला अचानक खोकला सुरू झाला. शेजारी असलेल्या डॉ. शुभांगीने लक्ष्मीताईचे खोकणे ऐकले. विचारपूस करण्यासाठी रात्र असूनही ती घरी पोहोचली. शुभांगीने ताईच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना खोकल्याचे औषध दिले व त्यांच्या जवळच बसून राहिली. लक्ष्मीताईला आराम पडावा म्हणून शुभांगी स्वतः ताईचे हात-पाय हळूवारपणे दाबू लागली. ताईचे डोळे पाणावले.

शुभांगीने ताईला विचारले, 'ताई, काय होतंय तुम्हाला.' लक्ष्मीताई काहीच बोलल्या नाही. शुभांगीने पुन्हा विचारल्यावर ताई म्हणाल्या, 'तुझी सेवा पाहून मला माझा मुलगा व सुनेची आठवण झाली. माझी सुन तृप्तीही अशी माझी काळजी घेत होती. माझी मुलगा सचिन इंजिनियर आहे. माझ्या पतीच्या मृत्युनंतर तोच तर माझ्या आशेचा किरण होता. माझ्या सुनेला दिवस गेले. तेव्हा मला खूप आनंद झाला. नातूच पाहिजे म्हणून मी तिला जबरदस्ती करून गर्भजल चाचणी करायला लावली. तिच्या पोटात मुलीचा गर्भ वाढत होता. तो मी ‍तिच्या इच्छेविरूध्द काढून टाकायला लावला. मात्र तो गर्भपाताचा धक्का तृप्ती सहन करू शकली नाही. काही दिवसातच ती आजारी पडली आणि त्या आजाराच ती गेली.'

तृप्तीचे अचानक जाण्याने सचिन एककी पडला. माझ्यावर नाराज होऊन अमेरिकेत स्थायिक झाला आहे. मी मा‍त्र इथे एकटी पडली आहे. आता मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होतोय. मी माझ्या नातीचा गर्भ पाडला नसता तर माझा मुलगा, सुन व नात माझ्यासोबतच असते. माझ्या नातीला मी तुझ्यासारखेच डॉक्टर केले असते. तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती.' असे म्हणून लक्ष्मीताईंचे डोळे झरझर वाहू लागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi